मी सावरकर २०१८ - नियमावली

  

वक्तृत्व विषय:


१. द्रष्टे सावरकर

२. योद्धा सावरकर

३. समाज सुधारक सावरकर

४. हिंदुत्ववादी सावरकर

५. विज्ञाननिष्ठ सावरकर

६. साहित्यिक सावरकर

 

बक्षीस 

 

स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी :


1 ले बक्षीस रु 10,000

2 रे बक्षीस रु 5,000

5 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु 1000 


 

उपरोक्त बक्षिसांखेरीज सहा गटातील सहा प्रथम क्रमांकाचे स्पर्धकांमधून एक सर्वोत्तम विजेता निवडण्यात येईल आणि सदर स्पर्धकाला अंदमानचे पर्यटन आम्ही पुरस्कृत करीत आहोत. यामध्ये भारतातून विमानाने जाण्या येण्याचा आणि तेथील वास्तव्याचा खर्च स्पर्धकाला करावा लागणार नाही. स्वा. सावरकर यांचे पुण्यतिथीचे निमित्ताने २६ फेब्रुवारी २०१९ ला अंदमान येथे एक खास समारंभ होणार आहे. या सभेत या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आपले वक्तृत्व सादर करण्याची संधी मिळणार आहे. आपणाला माहित आहेच की स्वा. सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर तेथील तुरुंगात ठेवले होते. हजारो लोक या स्थळाला दर वर्षी भेट देत असतात. आम्हाला हे कळविण्यात आनंद वाटतो आहे की ही अंदमान भेट पुरस्कृत करून त्याचा खर्च उचलण्याचा निर्णय एक सावरकर भक्त कॅप्टन निलेश गायकवाड ( सावरकर अभिवादन यात्रेचे प्रणेते आणि अध्यक्ष शिवसंघ प्रतिष्ठाण) यांनी घेतला आहे. 


वयोगट विभागणी:

   

१) गट क्र. १  - इयत्ता ५ – ८ (व्हाट्सअँपवर क्रमांक ९९२१६०००६१ )

२) गट क्र. २ - इयत्ता ९ – १२ (व्हाट्सअँप क्रमांक ९९२१६०००६२ )

३) गट क्र. ३ - महाविद्यालयीन विद्यार्थी (व्हाट्सअँप क्रमांक ९९२१६०००६३ )

४) युवा  गट - वय वर्षे २२ ते ४५ पर्यंत (व्हाट्सअँप क्रमांक ९९२१६०००६४ )

५) वरिष्ठ गट - वय वर्षे ४५ ते ६० पर्यंत (व्हाट्सअँप क्रमांक ९९२१६०००६५ )

६) ज्येष्ठ गट - वय वर्षे ६० आणि पुढे (व्हाट्सअँप क्रमांक ९९२१६०००६८ )
 

  

पात्रता:-


१) ‘मी सावरकर २०१८’ ही वक्तृत्व स्पर्धा सर्व भारतीय पुरुष/स्त्री नागरिकांसाठी खुली आहे परदेशातूनही प्रवेशिका येऊ शकतात. 


२)  स्पर्धा मराठी, हिंदी आणि इंग्रजी या माध्यमामधून सहभागास खुली राहील .


३) या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांकडून कोणतीही फी (प्रवेश शुल्क) आकारली जाणार नाही.

  

स्पर्धा प्रक्रिया:-


४) प्रत्येक सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकाने आपले भाषण स्वखर्चाने ऑडिओ व्हिजुअल (दृकश्राव्य) स्वरूपात आधी रेकॉर्ड करून घ्यायचे आहे. हे रेकॉर्डिंग मोबाईल फोन, संगणक, लॅपटॉप, कॅमेरा व इतर उपकरणे वापरून करण्यास कोणतीही हरकत नाही.


५) स्पर्धेच्या मुख्य भाषणासाठी  सात  मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. रेकॉर्डिंगचे सुरुवातीस आपला गट, आपले नांव , गांव आणि विषय नमूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी ३० सेकंद जास्तीचा वेळ दिलेला आहे. मर्यादित वेळेपेक्षा जास्त कालावधीचे सहभाग नाकारले जातील व स्पर्धेसाठी अपात्र ठरतील.


६) आपले रेकॉर्डिंग वरील मोबाईल नंबरवर व्हाट्सअँप द्वारा किंवा mesavarkar@gmail.com या पत्त्यावर ई-मेल द्वारा पाठवावेत.


७) स्पर्धेसाठी रेकॉर्डिंग पाठविण्याची अखेरची तारीख दिनांक ३० एप्रिल २०१८ (सोमवार) रात्री बारा वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आलेल्या रेकॉर्डिंग अपात्र राहतील.


८) ‘मी सावरकर’ या स्पर्धेत प्रत्येक गटातील विजेते निवडण्यात येऊन त्याची माहिती यशस्वी स्पर्धकास फोन अथवा ई-मेल द्वारे २० मे २०१८ पर्यंत कळविण्यात येईल.


९) स्पर्धेचे मूल्यमापन:


मूल्यमापन हे खालील दोन निकषांवर आधारित केले जाईल.


अ) भाषणातील मुद्दे, त्यांची स्वीकारार्हता. सावरकरांचे विचारांची सुसंगत मांडणी आणि समालोचन.

ब) विचारांचे सादरीकरण, भाषेचा दर्जा आणि श्रोत्यांचा प्रतिसाद मिळवण्याची क्षमता.


१०) स्पर्धेतील भाषण हे पाठ केलेले किंवा उस्फुर्त असू शकते. लिखित भाषण वाचून वक्तृत्वास मनाई आहे. तथापि फक्त मुद्दा बघण्यास हरकत नाही. आपण घरी हे रेकॉर्डिंग केले असल्याने आपण या अटींचे पालन कराल असे आम्ही विश्वासाने ग्रुहीत धरत आहोत. 


११) आपले भाषणाचे आम्ही खास नेमलेले परीक्षक परीक्षण करतील. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणि निर्णयाबद्दल सहभागी व्यक्ती किंवा इतर कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही याची नोंद घ्यावी.


इतर अटी:-


१२)  सहभागी स्पर्धकांना हे मान्य आहे आणि ते पुढील गोष्टीची पुष्टी/अनुमोदन करतात की ‘मी सावरकर – २०१८' चे आयोजक स्वानंद चँरिटेबल ट्रस्टची सहभागी स्पर्धकाच्या रेकॉर्डिंगवर पूर्ण मालकी आणि अधिकार राहील. स्पर्धेतील रेकॉर्डिंगचा ते कुणाच्याही पूर्वपरवानगीशिवाय योग्य तसा उपयोग करू शकतील. यावर कोणालाही कोणताही आक्षेप घेता येणार नाही. 


१३) वरील अटी आणि नियम यांना आपण पूर्णपणे बांधील अहात आणि तशी निसंधिग्ध संमती आपण देणे आवश्यक आहे.


२२ मार्च २०१८

पुणे

संपर्क : mesavarkar@gmail.com 


  

संयोजक : स्वानंद चँरिटेबल ट्रस्ट, पुणे 


सह संयोजक : हिंदू हेल्पलाईन


संयोजन समिती : 


सीए धनंजय बर्वे (अध्यक्ष), सीए रणजीत नातू , प्रविण गोखले , शैलेश काळकर, सीए अमेय कुंटे.