स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १३५ वी जयंती येत्या २८ मे रोजी संपन्न होत आहे. त्यानिमित्त स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, हिंदू हेल्पलाईन आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांचे विद्यमाने भारतीय नागरिकांसाठी एक मोठी वक्तृत्वस्पर्धा आयोजित केली होती. या वक्तृत्व स्पर्धेसाठी अबाल वृद्धांसाठी सहा वयोगट केले होते. तसेच सावरकरांच्या विविध गुणांच्या पैलूंवर प्रकाश टाकण्यासाठी सहा विषय दिले होते. विशेष म्हणजे यास्पर्धेसाठी व्हाट्स अँपचा वापर करून भाषणाच्या ऑडिओ व्हिजुअल रेकॉर्डिंग च्या स्वरूपात प्रवेशिका स्वीकारल्या होत्या. स्पर्धेसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही माध्यमातील भाषणांना अनुमतीदिलेली होती. तसेच परदेशस्थ अनिवासी भारतीयांसाठी देखील ही स्पर्धा खुली होती. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात आली नाही.


स्पर्धेसाठी सर्वश्री शरद पोंक्षे, नितीश भारद्वाज, राहुल सोलापूरकर, प्रवीण जाधव, प्रवीण तरडे, योगेश सोमण, श्रीरंग गोडबोले, सात्यकी सावरकर,राजेश दामले, मिलिंद वेर्लेकर,अरविंद रानडे, प्रकाश पाठक, निपुण धर्मधिकारी, डॉ पिंपळखरे, कॅप्टन निलेश गायकवाड, सुनील अभ्यंकर, मंदार परळीकर तसेच सौ. धनश्री लेले या प्रसिद्ध आणि सावरकरांचे ख्यातनाम अभ्यासक म्हणून परिचित असलेल्या व्यक्तींची परीक्षक म्हणून नेमणूक केली होती. 


स्पर्धेसाठी प्रत्येक गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये दहा हजार, दुसऱ्या क्रमांकाचे रुपये पाच हजार आणि एक हजाराची पाच उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.  


स्पर्धा प्रतिसाद


आनंदाची गोष्ट म्हणजे स्पर्धेला अत्यंत उत्साहवर्धक आणि भरभरून प्रतिसाद हा सर्वच गटातून, तसेच महाराष्ट्र आणि विविध इतर राज्ये आणि परदेशातूनही मिळाला. एकूण तीनशे एकवीस स्पर्धक यास्पर्धेत सहभागी झाले. सर्व विषयांवर सर्व वयोगटातून स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या हे उल्लेखनीय. त्यात स्त्रियांचा सहभाग ( ६४%) ही वैशिष्ठ्यपूर्ण गोष्ट दिसली. भारतातील पन्नासपेक्षा अधिक गावांतून आणि थायलंड, अमेरिका इथूनही प्रवेशिका आल्यात ही बाब स्पर्धेचे लक्षणीय यश अधोरेखित करते.


या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ  २७ मे रोजी पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटर मध्ये आयोजित करण्यात आला होता . स्वा. सावरकर हे यामहाविद्यालयाचे माजी विद्यार्थी त्यामुळे ही बाब औचित्य पूर्ण आहे. सभेसाठी मा. खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते तर अध्यक्षपद डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या  नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ.  शरद कुंटे ह्यांनी भूषविले. 'राष्ट्रभक्त वीर सावरकर' ह्या विषयावर डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी ह्यांचे व्याख्यान ७०० हुन अधिक श्रोत्यांपुढे झाले . 

वक्तृत्व विषय

१. द्रष्टे सावरकर


२. योद्धा सावरकर


३. समाज सुधारक सावरकर

 

४.   हिंदुत्ववादी सावरकर


५.   विज्ञाननिष्ठ सावरकर


६. साहित्यिक सावरकर

वक्तृत्व स्पर्धेविषयी माहिती आणि नियम

 

सावरकर हे विज्ञाननिष्ठ आणि नवीन तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते असल्या कारणाने आम्ही ही स्पर्धा आजच्या कालानुरूप व्हाट्सअँप च्या माध्यमातून घेण्याचे योजिले आहे. त्याला आपला उत्तम प्रतिसाद लाभेल हीच आमची अपेक्षा.

पारितोषिक

 

रोख बक्षीस स्पर्धेतील प्रत्येक गटासाठी :

1 ले बक्षीस रु 10,000

2रे बक्षीस रु 5,000

5 उत्तेजनार्थ बक्षिसे प्रत्येकी रु 1000 

  

अंदमान भेट

  

उपरोक्त बक्षिसांखेरीज सहा गटातील सहा प्रथम क्रमांकाचे स्पर्धकांमधून एक सर्वोत्तम विजेता निवडण्यात येईल आणि सदर स्पर्धकाला अंदमानचे पर्यटन आम्ही पुरस्कृत करीत आहोत. यामध्ये भारतातून विमानाने जाण्या येण्याचा आणि तेथील वास्तव्याचा खर्च स्पर्धकाला करावा लागणार नाही. स्वा. सावरकर यांचे पुण्यतिथीचे निमित्ताने २६ फेब्रुवारी २०१९ ला अंदमान येथे एक खास समारंभ होणार आहे. या सभेत या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना आपले वक्तृत्व सादर करण्याची संधी मिळणार आहे. आपणाला माहित आहेच की स्वा. सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यावर तेथील तुरुंगात ठेवले होते. हजारो लोक या स्थळाला दर वर्षी भेट देत असतात. आम्हाला हे कळविण्यात आनंद वाटतो आहे की ही अंदमान भेट पुरस्कृत करून त्याचा खर्च उचलण्याचा निर्णय एक सावरकर भक्त कॅप्टन निलेश गायकवाड ( सावरकर अभिवादन यात्रेचे प्रणेते आणि अध्यक्ष शिवसंघ प्रतिष्ठाण) यांनी घेतला आहे. 

पूर्वतयारी मार्गदर्शन

या निवेदनाचा आपण जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करून ते असंख्य लोकांपर्यंय पोचवावे असे आवाहन आम्ही आपणास करीत आहोत. सावरकरांचे एक गाढे अभ्यासक डॉक्टर पिंपळखरे यांनीही सहकार्याचा हात पुढे केला आहे. स्पर्धकांना आपले भाषणाची पूर्वतयारी करताना काही मुद्दे किंवा अन्य मार्गदर्शन हवे असल्यास स्पर्धकांनी डॉक्टर पिंपळखरे यांच्याशी संपर्क साधून (मो. क्र. ९८९००२९४६९ ) स्वतःच्या समस्यांचे निराकरण करून घ्यायला हरकत नाही. 

निवेदन

Video

Shri Nitish Bharadwaj on MeSavarkar 2018 - a Unique Elocution Competition via Whatsapp in Hindi, Marathi and English 

Video

श्री. शरद पोंक्षे  : विशेष निवेदन - ‘मी सावरकर २०१८’ - एक "अभिनव" खुली वक्तृत्वस्पर्धा

Video

"तुम्ही जगात कुठेही असाल तरी ह्या स्पर्धेत भाग घेऊ शकता" - निपुण धर्माधिकारी 

मी सावरकर २०१८ - पारितोषिक विजेते

Winners (pdf)

Download

निवेदन

पारितोषिक वितरण समारंभ आणि डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी ह्यांचे व्याख्यान

निवेदन (pdf)

Download

Contact Us

Send Message

‘मी सावरकर २०१८’ - एक "अभिनव" खुली वक्तृत्वस्पर्धा

Swanand Chaitable Trust, Pune

Reach Out...

‘मी सावरकर' च्या भावी उपक्रमामध्ये आपणास सहभागी व्हायचे असेल तर आम्हाला आवश्य कळवा.