[vc_row][vc_column][vc_empty_space][vc_column_text]
मी सावरकर – एक ‘अभिनव’ वक्तृत्व स्पर्धा
वर्ष नववे : २०२५-२०२६
स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांचे विद्यमाने ‘मी सावरकर – एक ‘अभिनव’ वक्तृत्व स्पर्धा’ मागील ८ वर्षे संपन्न झाली.
सावरकर हे विज्ञाननिष्ठ आणि नवीन तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते असल्या कारणाने WhatsApp हे आधुनिक माध्यम वापरण्याची प्रेरणा मिळाली. स्पर्धेला अत्यंत उत्साहवर्धक आणि भरभरून प्रतिसाद सर्वच गटातून, तसेच महाराष्ट्र आणि विविध इतर राज्ये आणि परदेशातूनही मिळाला.
‘मी सावरकर’ ह्या अभिनव वक्तृत्व स्पर्धेचे नववे चरण ऑक्टोबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ ह्या कालावधीमध्ये आयोजित केले आहे. वक्तृत्व सादरीकरणामध्ये विविध विषयांबरोबर संगीतमय सावरकर, नाट्यवाचन सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे.
स्पर्धा WhatsApp च्या माध्यमातून घेतली जाईल. स्पर्धेच्या मुख्य भाषणासाठी ७ मिनिटे, संगीतमय आणि नाट्यवाचनासाठी १० मिनिटांचा कालावधी आहे. स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषांतून सहभागास खुली आहे आणि जगभरातून कुठूनही आपण प्रवेशिका पाठवू शकता.[/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_separator border_width=”2″][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_column_text]
पूर्वतयारी मार्गदर्शन
या निवेदनाचा आपण जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करून ते असंख्य लोकांपर्यंय पोचवावे असे आवाहन आम्ही आपणास करीत आहोत. सावरकरांचे एक गाढे अभ्यासक डॉ. प्रसाद पिंपळखरे यांनीही सहकार्याचा हात पुढे केला आहे. स्पर्धकांना आपले भाषणाची पूर्वतयारी करताना काही मुद्दे किंवा अन्य मार्गदर्शन हवे असल्यास स्पर्धकांनी डॉ. पिंपळखरे यांच्याशी संपर्क साधून (मो. क्र. ९८९००२९४६९) स्वतःच्या समस्यांचे निराकरण करून घ्यायला हरकत नाही.
तसेच खालील वेबसाइटवर माहिती आणि संदर्भ उपलब्ध आहेत :
http://savarkar.org, https://www.savarkarsmarak.com[/vc_column_text][/vc_column][/vc_row]
