- ‘मी सावरकर’ ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. जगभरातून कुठूनही आपण प्रवेशिका पाठवू शकता.
- स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषांतून सहभागास खुली आहे.
- या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांकडून कोणतीही प्रवेश शुल्क (फी) आकारले जाणार नाही.
पात्रता
स्पर्धा प्रक्रिया
- प्रत्येक सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकाने आपले भाषण स्वखर्चाने ऑडिओ व्हिज्युअल (दृकश्राव्य) स्वरूपात आधी रेकॉर्ड करून घ्यायचे आहे. हे रेकॉर्डिंग मोबाईल फोन, संगणक, लॅपटॉप, कॅमेरा व इतर उपकरणे वापरून करण्यास कोणतीही हरकत नाही.
- नाट्यवाचन ऑडिओ स्वरूपात पाठवायचे आहे. नाट्यवाचनाचे सादरीकरण १ ते ५ जणांच्या गटाने करण्यास परवानगी आहे.
- स्पर्धेच्या मुख्य भाषणासाठी आणि काव्य निरूपणासाठी ७ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. कमीतकमी कवितेच्या १०-१२ ओळी काव्य निरूपणासाठी निवडाव्यात.
- संगीतमय आणि नाट्यवाचनासाठी १० मिनिटांचा कालावधी आहे.
- वाद-विवाद कौशल्यसाठी १५ मिनिटांचा कालावधी आहे.
- सर्व गटांसाठी नेमलेल्या वेळेव्यतिरिक्त स्वपरिचयासाठी ३० सेकंद मिळतील. त्यामध्ये रेकॉर्डिंगचे सुरुवातीस आपला गट, आपले नाव, गाव आणि विषय नमूद करणे आवश्यक आहे.
- मर्यादित वेळेपेक्षा जास्त कालावधीचे सहभाग नाकारले जातील व स्पर्धेसाठी अपात्र ठरतील.
- आपले रेकॉर्डिंग दिलेल्या WhatsApp नंबरवर किंवा contact@mesavarkar.com या पत्त्यावर ई-मेल द्वारा पाठवावेत.
- स्पर्धेसाठी रेकॉर्डिंग पाठविण्याची अखेरची तारीख मंगळवार, ३१ डिसेंबर २०२४ रात्री १२ वाजेपर्यंत आहे.
- ‘मी सावरकर’ या स्पर्धेत प्रत्येक गटातील विजेते निवडण्यात येऊन त्याची माहिती यशस्वी स्पर्धकास फोन अथवा ई-मेल द्वारे फेब्रुवारी २०२५ मध्ये कळविण्यात येईल.
स्पर्धेचे मूल्यमापन
- स्पर्धेचे मूल्यमापन हे खालील दोन निकषांवर आधारित केले जाईल.
अ) मुद्दे, त्यांची स्वीकारार्हता, सावरकरांचे विचारांची सुसंगत मांडणी आणि समालोचन.
ब) विचारांचे सादरीकरण, भाषेचा दर्जा आणि श्रोत्यांचा प्रतिसाद मिळवण्याची क्षमता. - स्पर्धेतील भाषण हे पाठ केलेले किंवा उस्फुर्त असू शकते. लिखित भाषण वाचून वक्तृत्वास मनाई आहे. तथापि फक्त मुद्दा बघण्यास हरकत नाही. आपण घरी हे रेकॉर्डिंग केले असल्याने आपण या अटींचे पालन कराल असे आम्ही विश्वासाने गृहीत धरत आहोत.
- आपल्या भाषणाचे, गाण्याचे आणि नाट्यवाचनाचे आम्ही खास नेमलेले परीक्षक परीक्षण करतील. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणि निर्णयाबद्दल सहभागी व्यक्ती किंवा इतर कोणीही आक्षेप घेऊ शकणार नाही याची नोंद घ्यावी.
इतर अटी
- सहभागी स्पर्धकांना हे मान्य आहे आणि ते पुढील गोष्टीची पुष्टी/अनुमोदन करतात की ‘मी सावरकर’ चे आयोजक स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टची सहभागी स्पर्धकाच्या रेकॉर्डिंगवर पूर्ण मालकी आणि अधिकार राहील. स्पर्धेतील रेकॉर्डिंगचा ते कुणाच्याही पूर्व परवानगीशिवाय योग्य तसा उपयोग करू शकतील. यावर कोणालाही कोणताही आक्षेप घेता येणार नाही.