खुप सुंदर उपक्रम आहे आपला, खरे तर आज सगळ्या भारतभर सावरकरांचे विचार पोहोचले पाहिजेत पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही…पण आपण हे कार्य खुप जोमाने करत आहात त्यासाठी आपल्या सर्व टीमला मनःपूर्वक शुभेच्छा !!!! युवराज भोसले ( ठाणे ) 
भोसले युवराज पुंडलिक
 माझ्या वाढदिवशी नकळतपणे तुम्ही मला ह्या वक्तृत्व स्पर्धेची भेट दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानते… ह्याच्यासारखी दुसरी भेट नाही… फार फार आनंद झालाय
श्वेता डोंगरे

स्पर्धे साठी खूप शुभेच्छा

 

गजानन कृष्णाजी पिसे

Very nice work for country best of luck

 

Vinod Dattatray Deshpande
सावरकर कळणे ही आजच्या काळाची गरज आहे. कारण मी जवळपास सर्व स्वातंत्र्य सेनानी वाचले मात्र सावरकरांसारखा विज्ञानवादी व स्पष्ट व्यक्ती मी वाचला नाही. आज सावरकरांना मानणारे कमी असतील मात्र उद्या सावरकरांव्यतिरिक्त काही चालणार नाही.
राज अहेरराव
नमस्कार. हा खरोखरच कौतुकास्पद व स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. आपण याबरोबरच आपल्या वेबसाईटवर सर्व सहभागी उमेदवार व इच्छुकांच्या देश व समाज सुधारणाबाबतचे सल्ले व मागॅदशॅन मागविण्यात यावेत. व वेबसाईटवरच faq काॅनॅर सुरू करण्यात यावे. ही विनंती. प्रणाम.
आनंद बिरादार

एक स्तुत्य उपक्रम आज खरंच सावरकरांच्या विचारांची समाजाला नितांत गरज आहे. ते सगळयांन पर्यंत पोहोचले पाहिजे

 

डॉ. मेघा मालपांडे

खुपच छान

 

महादेव हिराजी जाधवर

खुप छान.

 

अ‍ॅड राजीव वामन आपटे

अतिशय स्तुत्य उपक्रम. या उपक्रमामुळे सावरकरांचा गौरव,त्यांच्या यथोचित कार्याबद्दल इत्यंभूत माहिती आणि त्यांना अभ्यासण्याची संधी व त्यांचे पैलू जाणून घेण्याची सुवर्णसंधी यामुळे मिळत आहे असे वाटते.

 

स्मिता प्रभाकर जोशी

अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आजच्या नव्या पिढीला स्वातंत्रवीर सावरकर उमजतील सुंदर खूप सुंदर

 

शेखर धुमाळ

नमस्ते *मी सावरकर* टीम आपले मनपूर्वक आभार अन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा……

 

राहूल शिवाजी मोरे

इतके सुंदर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि सावरकर आजच्या पिढीला जश्यास तसे समजावून देण्याच्या या उपक्रमासाठी अतिशय ऋणी आहे.

 

प्राजक्ता पंकज साखरकर
Very nice strategy used for this competition. Outstanding!!
OMPRKASH EKNATH SHINDE

कार्यक्रम यशस्वी होणार, हार्दिक शुभेच्छा. सावरकर म्हणजे आमच्या साठी तुझं साठी मरण ते जनन तुजविण जनन ते मरण. हे जाला समजले त्याचे जीवन यशस्वी झाले.

 

संतोष

या स्पर्धेचे सातत्य कायम ठेवून सावरकर विचार अम्यासायची संधी अनेकाना उपलब्ध करून दिल्याबद्दल संयोजकाना धन्यवाद. मी ज्येष्ठ नागरिक गटात भाग घेऊ इच्छितो.

 

प्रभाकर खाडिलकर

नमस्कार, शाळेच्या व्यासपीठावर वेगवेगळ्या महापुरुषांवर थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलण्याने माझ्या मुलीवर बर्याच शिक्षक मंडळींचं लक्ष होतं, त्यातच एका शिक्षिकेने \”या\”बद्दल लिंक व इतर माहिती सांगितली.\”सावरकर\” हा विषयच मुळी आवडीचा पण मुलीला या विषयावर बोलतं करण्याचा योग आला नव्हता-येत नव्हता. \”या\”राबविण्यात येणाऱ्या संकल्पनेबद्दल किंवा एकंदरीत कार्यक्रमाबद्दल करावं तेवढं कौतुक कमीच आहे. वास्तविक मी खूप मोठा तत्त्वचिंतक,तत्त्ववेत्ता,अभ्यासक नाही .पण तरीही या निमित्त्यानं थोडंसं deep वाचता आलं लिहिता आलं. मुलीला बोलता आलं.26जानेवारी2020 च्या म्हणजे याच प्रजासत्ताक दिनाला या वक्तृत्वात सुरुवातीला व शेवटी बदल करून स्टेज वर बोलल्याने शाळेला(विशेष करून सावरकर द्वेष्टींना) सावरकरांची ओळख झाली.शाळेकडून रोख बक्षीस हि दिल्या गेलं. विशेष बाब हि आहे कि \”सावरकारांवरही\” कोणी बोलू शकते हे इथल्या नकारात्मक प्रवृत्तीना कळून चुकले…आणि याचे श्रेय जाते या कार्यक्रमाच्या आयोजनाला.बद्दल आपले खूप आभार. थोडंसं सुचवावसं वाटते की जिल्हा-विभागीय किंवा इतर पातळ्यावरही स्पर्धा घेण्यात यावी सहभाग वाढेल..जेणेकरून मुलं-विध्यार्थी-पालक-शिक्षक आणि एकंदरीत सामान्य माणूस \”सावरकारांबद्दल\”सकारात्मक विचार करायला प्रवृत्त होईल. वर्तमानाचा आपण अभ्यास करत आहातच.नकारात्मक परिस्थितीने स्फोटक रूप धारण केलय.बदल घडायला मदत व्हावी हा मूळ उद्देश आहे. कार्यक्रमाची संकल्पना -आयोजकांना पुनच्च धन्यवाद देतो. भरभरून प्रतिसाद मिळो, स्पर्धकांची संख्या वाढो व निमित्ताने \”सावरकर\” घर-घरात, मना-मनात पोहचो. हि सदिच्छा व्यक्त करतांना थांबतो. धन्यवाद , जय हिंद जय भारत। !

 

योगेंद्र गणेश गुळवे

या स्पर्धेत सहभागी होऊन खरंच खूप छान वाटलं कारण ही फक्त स्पर्धा नाही तर एक संधी आहे सावरकरांचे विचार मांडण्याची आणि ती आत्मसात करण्याची. आयोजकांचे खुप खुप आभार.

 

पूजा परळे