नमस्कार,

स्वातंत्रवीर सावरकर यांचे विचार समजा मध्ये पोचवण्यासाठी आम्ही गेली ४ वर्ष मी सावरकर ही वक्तृत्व स्पर्धा, व्हॉट्सॲप द्वारे आयोजित करीत आहोत. या वर्षी कोविड काळात देखील जगभरातून साधारण ६०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. यालाच अनुसरून सावरकर जयंती (२८मे) निमित्त आम्ही एक व्याख्यानमाला अंदमान पर्व, येत्या शुक्रवार पासून २८ मे पर्यंत फेसबुक च्या माध्यमातून सादर करीत आहोत. स्पर्धेतील विजेत्यांची भाषणे तसेच मान्यवरांचे विचार आपल्याला अंदमान पर्व या व्याख्यानमाले द्वारे ऑनलाईन ऐकता येणार आहे. अधिक माहिती सोबतच्या पत्रकात आहेच. आपण याचा लाभ घ्यावा तसेच जास्तीत जास्त सावरकर प्रेमी पर्यंत ही माहिती पोचवावी ही विनंती .

व्याख्यानमाला २०२१