सर्वगटांसाठी वेळेची मर्यादा काय आहे?
सर्व वक्तृत्व आणि काव्य निरुपण प्रकारासाठी वेळेची मर्यादा सात मिनिटे आणि वैयक्तिक ओळखीसाठी ३० सेकंद जास्ती अशी आहे. नाट्यवाचनासाठी वेळेची मर्यादा दहा मिनिटे आणि वैयक्तिक ओळखीसाठी ३० सेकंद जास्ती अशी आहे.
‘संगीतमय सावरकर’ साठी वाद्यांचा समावेश आवश्यक आहे का? किती लोक यात सहभागी होऊ शकतात? व्हिडीओ पाठवणे आवश्यक आहे का?
‘संगीतमय सावरकर’ साठी वाद्यांचा समावेश ऐच्छिक आहे , आवश्यक नाही. कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त पाच जण गीत सादर करू शकतात. व्हिडीओ पाठवणे आवश्यक नाही तुम्ही ऑडीओ क्लिप पाठवू शकता.
नाट्यवाचनात किती जणांनी भाग घ्यायचा याची काही मर्यादा आहे का?
नाट्यवाचनाचे सादरीकरण हे एका व्यक्ती द्वारे किंवा ५ व्यक्तीं पर्यन्त च्या ग्रुप मध्ये करू शकता.
तुम्ही तुमचासहभाग इतर कोणत्या मार्गाने (जसे की टेलीग्राम, इन्स्टाग्राम) नोंदवू शकता का?
तुम्ही तुमचा सहभाग whatsapp अथवा ईमेल द्वारे नोंदवू शकता. आमचा ईमेल चा पत्ता – mesavarkar@gmail.com
लहान वयोगटातील मुलांनी काव्य निरूपण करणे अपेक्षित आहे का फक्त फटका अथवा शिवरायांची आरती म्हणाली तर चालेल?
कोणत्याही गटातील ‘काव्य निरुपण’ प्रकारात दिलेल्या काव्याचा अर्थ (निरुपण) असे अपेक्षित आहे फक्त चालीवर आरती अथवा काव्य म्हणून दाखवणे अपेक्षित नाही.
नाट्यवाचन व काव्य अशा दोन्हीत भाग घेतला तर चालेल का?
हो,स्पर्धक दोन वेगवेगळ्या प्रकारात (नाट्यवाचन/काव्य/वक्तृत्व) भाग घेऊ शकतात. प्रत्येक गटामध्ये एका व्यक्तीचा एकाच विषयासाठी अथवा गाण्यासाठी सहभाग अपेक्षित आहे.
एका पेक्षा जास्त गाणी चाल लावून पाठवली तर चालेल का?
नाही,प्रत्येक गटामध्ये एका व्यक्तीचा एकाच विषयासाठी अथवा गाण्यासाठी सहभाग अपेक्षित आहे.
नाट्यवाचन मध्ये पोशाख करणे, संगीत वापरणे, एका पेक्षा जास्ती लोकांनी भाग घेणे ह्या साठी वेगळे गुण आहात का?
तसे गरजेचे नाही,यासाठी वेगळे गुण दिले जाणार नाहीत.
वेगवेगळय़ा शाळांमधून विद्यार्थी एक गट करून सहभागी होऊ शकतात का?
हो,हरकत नाही.गट सहभागात (नाट्य वाचन अथवा संगीतमय) वेगवेगळ्या वयोगटाचे अथवा शाळांचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
वीर सावरकरांच्या सर्व कविता कुठे व कशा पहाता येतील?
आम्ही सादर करत असलेल्या प्रवेशाच्या मध्ये असलेले वेळेअभावी गाळले तर चालेल का? प्रवेशातील कथा भाग श्रोत्यांपर्यंत पोहोचावा म्हणून एडीट केला तर चालेल का?
वेळेअभावी कथेतील काही भाग गाळला किंवा वगळला तर चालेल पण कथेत काहीही बदल म्हणजे editing नको. वगळलेल्या भागाविषयी व्हिडिओच्या सुरुवातीला कृपया नमूद करावे.