मी सावरकर – एक ‘अभिनव’ वक्तृत्व स्पर्धा –
वर्ष आठवे : २०२४-२०२५
स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांचे विद्यमाने ‘मी सावरकर – एक ‘अभिनव’ वक्तृत्व स्पर्धा’ मागील ७ वर्षे संपन्न झाली.
सावरकर हे विज्ञाननिष्ठ आणि नवीन तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते असल्या कारणाने WhatsApp हे आधुनिक माध्यम वापरण्याची प्रेरणा मिळाली. स्पर्धेला अत्यंत उत्साहवर्धक आणि भरभरून प्रतिसाद सर्वच गटातून, तसेच महाराष्ट्र आणि विविध इतर राज्ये आणि परदेशातूनही मिळाला.
‘मी सावरकर’ ह्या अभिनव वक्तृत्व स्पर्धेचे आठवे चरण सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ ह्या कालावधीमध्ये आयोजित केले आहे. वक्तृत्व सादरीकरणामध्ये विविध विषयांबरोबर काव्य निरूपण, संगीतमय सावरकर, नाट्यवाचन, वाद-विवाद कौशल्य सुद्धा समाविष्ट करण्यात आले आहे.
स्पर्धा WhatsApp च्या माध्यमातून घेतली जाईल. स्पर्धेच्या मुख्य भाषणासाठी आणि काव्य निरूपणासाठी ७ मिनिटे, संगीतमय आणि नाट्यवाचनासाठी १० मिनिटे, वाद-विवाद कौशल्यसाठी १५ मिनिटांचा कालावधी आहे. स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर भारतीय प्रादेशिक भाषांतून सहभागास खुली आहे आणि जगभरातून कुठूनही आपण प्रवेशिका पाठवू शकता.